आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांंचा पाठिंबा, खैरेंंचे ‘जय महाराष्ट्र’:देभेगावातील कार्यक्रमात दोन्ही नेते लोकसभेनंतर पहिल्यांदाच समोरासमोर

कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला. त्यानंतर रविवारी कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमात दोन्ही नेते समोरासमोर आले. ‘या वेळी साहेब, माझा तुम्हाला लोकसभेसाठी पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबतच आहे,’ असे जाधव यांनी खैरे यांना सांगितले. त्यावर खैरे यांनी स्मितहास्य केले आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ते निघून गेले. मात्र, खैरे- जाधव यांच्या भेटीची चर्चा जोरदार सुरू झाली.

लोकसभा निवडणुकीत जाधव यांना मिळालेल्या मतांमुळे खैरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर खैरे यांनी जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. देभेगाव येथील कार्यक्रमात पहिल्यांदाच दोन्ही नेते समोरासमोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले.

वाद मिटणार का याचीच चर्चा
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना यांना डावलून शुभांगी काजे यांना उमेदवारी दिली. संजना जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हा वाद वाढला. लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरे यांना पराभूत झाले. त्यानंतर उभय नेत्यांमधील वाद वाढतच गेला.या पार्श्वभूमीवर वाद मिटणार का, जाधव शिवसेनेत जाणार का, अशीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...