आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे माहीत आहे काय?:साखरेपेक्षा गूळ बरा...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरेच्या सेवनामुळे आरोग्याशी संबंधित विकार उद्भवतात. त्यामुळे दैनंदिन आहारात साखरेऐवजी गूळ अथवा मधाचे सेवन करा. गुळामध्ये खनिजे, क्षार, व्हिटॅमिन्स, जस्त, फॉस्फरस, तांबे यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. साखरेऐवजी गूळ का वापरावा हे जाणून घेऊयात...

लोहाचे प्रमाण - रक्ताची आणि रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खाणे फायदेशीर ठरते. २०० ग्रॅम गुळामध्ये २२ मिलीग्रॅम लोहाचे प्रमाण असते.

मासिक पाळी आणि प्रसूती - अनियमित जीवनशैली, ताणतणाव, तब्येतीकडे होणारं दुर्लक्ष यामुळे जवळपास सगळ्याच स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. हे वाढण्यासाठी वयात येणाऱ्या मुली, महिला तसंच गरोदर आणि बाळंतिणी यांनीही लोहाचं प्रमाण वाढवणाऱ्या गुळाचे सेवन करावे. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांनीही गुळ नियमित सेवन करावा.

रक्तदाबामध्ये उपयुक्त- गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य राहण्यास मदत होते. गुळामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. गुळामुळे पचनशक्ती सुधारून पोट नियमित साफ होते.

वातशमनात उपयोगी- गूळ उष्ण प्रवृत्तीचा असल्यामुळे वातनाशक असतो. गूळ सुंठीबरोबर खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जासंस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टिमला बळ मिळते. जुना गूळ खाल्ल्यास कफनाशनाचे कार्य होते. दमा, खोकला, अशक्तपणा यामध्येही गूळ खाणे उपयोगी ठरते.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...