आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैनम महिला मंचच्या वतीने सातव्या जैन एक्स्पोचे आयोजन ५ आणि ६ जानेवारीला करण्यात आले आहे. नवाबपुरा येथील हिराचंद कासलीवाल मैदानावर एक्स्पो होणार असून ७५ हून अधिक महिला उद्योजकांना संधी देण्यात आली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला जैनमच्या संस्थापिका भारती बागरेचा, अध्यक्ष मंगला पारख, करुणा साहुजी, मनीषा भन्साली, कविता अजमेरा उपस्थित होत्या.
बागरेच्या म्हणाल्या, ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. यामध्ये गृहोपयोगी वस्तू तसेच संक्रांतीनिमित्त महिलांनी घरी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असणार आहे. खाद्यपदार्थ, दागिने, कपडे, पापड, कुरडई, वडी, बिस्कीट, केक अशा विविध पदार्थांचे स्टॉल यामध्ये असतील. ७५ महिला उद्योजकांना प्रदर्शनात संधी देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, कन्नड, जालना, गुजरात, नाशिक, जळगाव, धुळे आणि परभणी येथील महिला उद्योजक सहभागी होत आहेत. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.