आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती:जायकवाडीत फेब्रुवारीत सुरू हाेईल जॅकवेलचे काम

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात आली असून जायकवाडी धरणात जॅकवेल उभारण्यासाठी कॉपरडॅम तयार करावा लागणार आहे. १ फेब्रुवारीपासून या कामाला सुरुवात करण्याचे आदेश कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी दिली.

शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. त्यासाठी हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने मजीप्राचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी शुक्रवारी जायकवाडी येथे जाऊन कामाची पाहणी केली. जायकवाडी धरणात जाण्यासाठी मातीचा भराव टाकून ३५० मीटर रस्ता तयार केला आहे. त्यापुढे अप्रोच बंधारा तयार करून कॉपरडॅम बनवला जाणार आहे. त्यासोबतच पुल उभारण्याच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...