आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील गोषेगाव 3, देऊळगाव कमानचे 2 आणि खंडाळा येथील 1 अशा एकूण 6 शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देवून व्यावसायिक सुगंधी जिरेनियम शेती पिकवण्याला व प्रक्रिया उद्योगातून सुगंधी तेल निर्मितीला महत्त्व दिले आहे. पावणेपाच एकरावर त्यांनी जिरेनियमची लागवड केली असून एकरी सव्वा लाख रूपये उत्पन्न मिळत आहे. अगळ्या वेगळ्या नगदी पिकातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांसमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला.
ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर शेतीत नशीब आजमवायला हरक नाही. कारण, आलीकडच्या काळात पारंपरिक शेतमालाशिवाय आरोग्य, सौंदर्य प्रसादने, आयुर्वेद आदीच्या दृष्टीने खूप महत्त्व प्राप्त झालेल्या पिकांची मागणीही प्रचंड वाढली आहे. अशा नगदी पिकांच्या शेतीमधून तुम्ही दुष्काळग्रस्त भागात, कमी पाणी व कमी खर्चात दुप्पट तिप्पट नफा कमवू शकता. अशाच प्रकारे सुगंधी लेमन ग्रास आणि जिरेनियम वनस्पती शेती पिकवण्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या दोन्ही पिकांच्या उत्पादनाला मोठी मागणी असून भावही चांगला मिळतो. या विषयी माहिती घेऊन जालना जिल्ह्यातील भोगरदन तालुक्यातील गोषेगावाचे रामनाथ मोहिते यांनी 1 एकर, कडूबा घोडे 30 गुंठे, तुळशीराम मोहिते 1 एकर, देऊळगाव कमान येथील विनोद पवार 20 गुंठे, विलास पवार 20 गुंठे, खंडाळा गावचे दत्तू सोनवणेंनी दीड एकरावर असे एकूण साडेपाच एकर 10 गुंठे क्षेत्रावर सुगंधी जिरेनियम पिकवण्याची किमया साध्य केली आहे.
प्रक्रिया युनिटही स्थापन केला
गोषेगावचे प्रगतशील शेतकरी रामनाथ मोहिते यांनी सर्वप्रथम सुगंधी जिरेनियम ची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांना एकरी 12 टन उत्पादन मिळाले. तर रामेश्वर मोहिते यांनी इंटरनेटच्या माध्यमातून व आरोमा तेल तयार करणाऱ्या विदेशी कंपनीकडून माहिती घेतली. श्रीरामपूर येथे जावून प्रत्यक्ष जिरेनियम पिकांची पाहणी केली व शेतकरी उत्पादक कंपनीकडून जिरेनियमचे रोप घेऊन लागवड केली. कृषीयूग शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्याची अगळी वेगळी यशस्वी शेती बघून आणखी पाच शेतकरी या शेतीकडे वळाले आहेत. उत्पादित मालावर प्रक्रिया करून सुगंधी तेल निर्मितीसाठी युनिट स्थापन केले. म्हणजेच लागवड व प्रक्रिया उद्योगाला महत्त्व देऊन अधिक नफा मिळवत आहेत. अशी माहिती जिरेनियम उत्पादक रामनाथ मोहिते, रामेश्वर मोहिते, दत्तू सोनवणे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली.
वैशिष्ट्येसुगंधी जिरेनियम गवतवर्गीय वनस्पती आहे. हलकी ते भारी शेत जमिनीत येते. एकरी 8 हजार रोप लागतात. एक रोप ७ रुपयांना मिळते. तीन वर्ष पुन्हा लागवड खर्च नाही. रोप निर्मिती होते. जून मध्ये लागवड केली तर ऑक्टोबर नोव्हेंबरपासून उत्पादन येण्यास सुरुवात होते. एका वर्षाला 3 तोडण्या होतात. एका तोडणीला 10 ते 11 टन सुगंधी पाल्याचे उत्पादन निघते. प्रक्रियेद्वारे सुमारे 12 ते 13 लिटर तेल मिळते. 12500(मागणी व पुरवठानुसार दरात चढउतार होतात)रुपये प्रतिलिटर भाव मिळतो. कंपनीसोबत थेट करार करून विक्री होते. जिरेनियमला दुसरा पर्याय नाही. विविध अत्तर, सौंदर्य प्रसाधनेसह विविध 120 प्रोडक्टमध्ये सुगंधी तेलाचा वापर होतो. त्यामुळे तेलाला मोठी मागणी आहे. त्या तुलनेत लागवड क्षेत्र अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यातून मोठी संधी आहे. प्रक्रियानंतर उरलेले पाणी फिनेल तयार करण्यासाठी व पेस्टेसाईड मध्ये वापरतात. गुरढोर खात नाही, अळी व कीडीचा प्रादुर्भाव होत नाही. सुगंध शेतीचा अर्धा किमीपर्यंत दरवळतोय. खिशात पान ठेवली तर अत्तर मारण्याची गरज नाही. पाल्यापासून सुगंधी तेल निघाल्यानंतर जो पेंड निघतो तोही उदबत्ती, धुप, कंपोस्ट खत निर्मितीसाठी विक्री होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.