आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना जळगाव रेल्वेमार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली. त्यांनी या मार्गाचे विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. पण राज्याच्या अर्थसं कल्पात या मार्गाऐवजी जालना- खामगाव या ११३ वर्षे जुनी मागणी असलेल्या मार्गासाठी राज्य सरकारने हिस्सा देण्याची घोषणा करून एक प्रकार मंत्री दानवेंनाच //"चकवा'' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात हाेत आहे.
दुसरीकडे, बुलडाणा आणि विदर्भाशी कनेक्ट व्हीटी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याने खामगाव मार्गाची घोषणा झाली. जालन्याहून जळगाव आणि तेथून पुढे थेट मध्य प्रदेशला जाण्याचा मार्ग सुलभ होणार असल्याने जालनेक ांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्या फाेल ठरल्या. दानवे यांच्याकडे रेल्वेमं ्रिपदाची जबाबदारी येताच त्यांनी जालना- खामगाव आणि जालना जळगाव या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करून घेतले होते. जालना- खामगाव या मार्गाचे यापूर्वीही अनेक वेळा सर्वेक्षण झाले. मात्र हा मार्ग परवडणारा नसल्याचा अहवाल येत असल्याने त्याचे काम पुढे सरकले नाही. दुसरीकडे जालना जळगाव या रेल्वेमा र्गासाठी स्वत: रावसाहेब दानवे आग्रही आहेत. रेल्वे विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, या मार्गासाठी जवळपास सहा हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. सध्या हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आहे. रेल्वे बाेर्ड यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून याचा अहवाल नीती आयोगाकडे जाणार आहे. नीती आयोगाने होकार दिल्यानंतर कोणताही अडसर राहणार नाही. दरम्यान, जालना- खामगाव या मार्गाची जालना जिल्ह्यातील लांबी १२ कि.मी.आहे.
विदर्भाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आग्रही
ब्रिटिशांनी सुरू केले काम खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, इतर कच्चा माल जालना स्थानकाहून थेट इंग्लंडला घेऊन जाता यावा यासाठी ब्रिटिश सरकारने १९१० च्या सुमारास जालना-खामगाव असा रेल्वेमार्ग प्रस्तावित केला होता. १९२९ मध्ये या मार्गाचे काम सुरू झाले. सेंट पेनेन्झुला कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. चार वर्षे काम चालले. दरम्यानच्या काळात दुसरे महायुद्ध सुुरू झाले. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा निर्णायक लढा सुरू झाला आणि ब्रिटिशांनी पळ काढला.
खामगाव मार्गावर भराव जालना-खामगाव मार्गावर रेल्वे रूळ टाकण्यासाठी १९२९ मध्ये तयार केलेले मातीचे भराव अजूनही दिसून येतात. काही ठिकाणी रेल्वे रुळाचे साहित्य टाकण्यात आले होते. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या मार्गाचे काम तेव्हा चार वर्षांतच बंद पडले. २००२ मध्ये या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा या मार्गासाठी २६ हजार कोटी रुपये अपेक्षित होते. मात्र त्यानंतर या प्रकल्प बासनातच राहिला. आता प्रकल्पाची किंमत वाढू शकते.
मामा चौकात फटाके फोडून रेल्वे संघर्ष समितीने जल्लोष केला.
जळगाव मार्गाचा विक्रमी वेळेत सर्व्हे जून २०२१ मध्ये रेल्वेमंत्री होताच काही दिवसांतच दानवेंनी या १४० किमी रेल्वेमार्गाची घोषणा केली. सर्व्हेसाठी साडेचार कोटी मंजूर केले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२२ रोजी फायनल लोेकेशन सर्व्हे, १४ ते १८ मे २०२२ या कालावधीत रडारद्वारे सर्व्हे केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.