आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांचे आकर्षण:शहरातील पर्यटकांची जम्मू-काश्मीरला पहिली पसंती; सिक्कीम, दार्जिलिंग, युरोप, दुबईकडेही आहे ओढा

छत्रपती संभाजीनगर / ऋषिकेश श्रीखंडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटकांनी या हंगामात पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला पसंती दिली आहे. जवळपास १५ हजार पर्यटकांनी जम्मू-काश्मीरचे बुकिंग केले आहे. तेथील ट्युलिप गार्डन के‌वळ एप्रिल महिन्यातच उघडते. पर्यटकांचा ओढा या ट्युलिप गार्डनकडे जास्त असतो. जम्मू-काश्मीरनंतर पर्यटकांची पसंती सिक्कीम, दार्जिलिंग, युरोप आणि दुबईला असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोविड-१९ च्या लाटेमुळे पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडले नव्हते. आता ही लाट ओसरल्यामुळे पर्यटक हळूहळू पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. यंदा जवळपास १ लाख पर्यटक पर्यटनासाठी जातील, असा अंदाज आहे. यापैकी सर्वाधिक पर्यटक जम्मू-काश्मीरला जाणार आहेत. जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. त्यामुळे पर्यटकांची पसंती जम्मू-काश्मीरला जास्त आहे. तेथील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. हे गार्डन बहरण्यासाठी मार्च आणि एप्रिल हा सर्वोत्तम काळ असतो. त्याशिवाय काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्यही पर्यटकांना खुणावत असते. त्यामुळेच पर्यटकांचा ओढा जम्मू-काश्मीरकडे जास्त आहे. जम्मू आणि काश्मीरनंतर पर्यटकांनी सिक्कीम, दार्जिलिंग या देशांतर्गत पर्यटनस्थळांना तर युरोप आणि दुबई या देशाबाहेरील स्थळांना पसंती दर्शवल्याची माहिती पर्यटन व्यवसायातील सूत्रांनी दिली.

कलम ३७० रद्द केल्यानंतर संख्येत वाढ ३७० कलम हटवल्यानंतर पर्यटकांची पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला पहिली पसंती आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी पर्यटकांना हल्ले होण्याची भीती वाटत असे. आता कलम ३७० कलम रद्द केल्यानंतर तेथील वातावरण शांत झाल्याने पर्यटकांचा ओढा जम्मू-काश्मीरकडे जास्त आहे. जम्मू-काश्मीर सुरक्षित असल्याची भावना कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याची पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटनासाठी जम्मू-काश्मीर आता सुरक्षित झाले असल्याची पर्यटकांची भावना झाली आहे. जम्मू-काश्मीरनंतर पर्यटकांची सिक्कीम, दार्जिलिंग, युरोप आणि दुबईला आहे. - अभिषेक दसगावकर, पर्यटक अभ्यासक.