आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणचा बोक्या खोक्यासाठी जाणार नाही:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा संदीपान भुमरे यांच्यावर अफलातून विश्वास

पैठण22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणचा बोक्या खोक्यासाठी कुठे जाणार नाही, असे म्हणत शिवसेनेतून होणाऱ्या टीकेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिले. ते पैठणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

जालना लोकसभा मतदारसंघात सर्व जनतेचा भाजप - शिवसेनेच्या युतीचा उमेदवारांच्या मागे राहणारी जनता या मतदारसंघात आहे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.

गेले 2 ते 3 महिने राज्याच्या राजकारणाची चर्चा जगभरात सुरू आहे. 2019 ला जी युती होती जिला जनतेची मान्यता होती. 2019 मध्येच भाजप - शिवसेनेचे सरकार यायला हवे होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार आले. यात मंत्री आमदारांसह जनता नाराज होती, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केली आहे.

2 हजार कोटींचा निधी

दानवे म्हणाले की, पैठणसाठी 2 हजार कोटींचा निधी दिला, तर सिल्लोडसाठी गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये 16 हजार कोटींचा निधी दिला आहे. आमचा पैठणचा बोक्या खोक्यासाठी कुठे जाणार नाही, असा टोला रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला लगावला आहे. या सरकारच्या काळात आपण विकास करू असे म्हणत रावसाहेब दानवेंनी आगामी निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला साथ द्यावी असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...