आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाकंभरी उत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांत देवीला भाज्या आणि फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक ठिकाणी देवीची सजावट भाज्यांनीच केलेली होती. निसर्गनिर्माता परमेश्वराला या काळात पिकणाऱ्या भाज्या आणि फळांनी रिझवण्याचा प्रयत्न भक्तगण करतात.
अडीचशे महिलांनी केले १०८ नामावलीचे कुंकुमार्चन यंदाही हडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरात शुक्रवारी अडीचशे महिलांनी देवीचा नामजप करत कुंकुमार्चन केले. जळगाव रोडवरील श्री रेणुकामाता मंदिरात महिलांनी श्रीसूक्त पठण, देवीचा जप, कुंजिका स्तोत्र, १०८ नामावलीचे कुंकुमार्चन केले. मंदिरात श्री रेणुकामातेला पुरणपोळीचा नेवैद्य दाखवण्यात आला. भाविकांना मसाला दुधाचे वाटप केले. या वेळी मंदिराचे अध्यक्ष सतीश वैद्य, सचिव सुधीर पाटील, अरुण देशपांडे, सुशील देशपांडे, जगन्नाथ उगले आदींची उपस्थिती होती.
शाकंभरी पौर्णिमा साजरी, फळभाज्यांची सजावट बीड बायपास परिसरातील रेणुकामाता मंदिरात अभिषेक, आरतीसह देवीला ५६ भोगचा प्रसाद अर्पण केला. सकाळी ११ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत अभिषेक, आरती करण्यात आली. यानंतर मातेला आंबट, तिखट, गोड असा ५६ भोग प्रसाद अर्पण करण्यात आला. या वेळी अप्पा महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन केले.या वेळी दीड हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज, गिरजामाता यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोसायटीच्या वतीने २० किलो पालेभाज्या केल्या अर्पण शहरातील रामतारा हाउसिंग सोसायटीत शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी सेवा समितीच्या वतीने सकाळी अभिषेक, पूजन करण्यात आले. या वेळी मेथी, पालक, करडी अशा विविध प्रकारच्या १० ते १५ किलो भाज्या शाकंभरी मातेला अर्पण करण्यात आल्या. ३० महिलांनी सकाळी मंगलपाठात सहभाग घेतला. यानंतर आरती करण्यात आली. या वेळी शाकंभरी मातेला ५६ भोग अर्पण करण्यात आले. तसेच आठ ते दहा कन्यांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.