आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये बिअर फेस्टिव्हल होतो, पण नाशिकच्या तुलनेत औरंगाबादेत बिअर उत्पादक आणि निर्यातदार अधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी बिअर फेस्टिव्हल घेता येणे शक्य आहे. याशिवाय पर्यटन, उद्योग या दोन्ही क्षेत्रांची अफाट क्षमता आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी औरंगाबादेत सिव्हिल एव्हिएशन परिषद घडवून आणण्याची गरज आहे. या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या टुरिझम कमिटीचे नवनिर्वाचित सहअध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
राज्याच्या पर्यटन धोरण निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या मसिआच्या पर्यटन समितीवर जसवंतसिंग राजपूत यांची झालेली निवड महत्त्वाची आहे. जसवंतसिंग म्हणाले, चेंबरतर्फे औरंगाबादेत २०११ मध्ये पर्यटन परिषद झाली. यामध्ये औरंगाबादच्या पर्यटनदृष्ट्या असलेल्या क्षमतेवर मंथन झाले. यामध्ये तयार केलेल्या अहवालाचा विचार पर्यटन धोरण निश्चित करताना झाला आहे. यामुळे औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा मिळाला होता. मात्र, पर्यटनासोबतच उद्योगात औरंगाबादचा आवाका अफाट आहे. याची जाणीव करून देत विमानसेवा वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे.
विविध परिषदांचे आयोजन : हवाई कनेक्टिव्हिटी वाढली तर शहराचे अर्थकारण प्रचंड वेगवान होईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल. याचा फायदा औरंगाबादसह परिसरातील अनेक जिल्ह्यांना होणार आहे. त्यामुळे विविध परिषदांचे आयोजन आणि त्यातून उपाययोजना करण्यासाठी माझी भूमिका मी निभावणार आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.