आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवाहर नवोदय प्रवेश चाचणी परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरु:ऑनलाईन अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेश चाचणी परिक्षा २०२३ साठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चाचणी परिक्षेसाठी आपले प्रवेश ऑनलाईन अर्ज ३१ जानेवारीपर्यंत सादर करावे असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

हे विद्यार्थी असतील पात्र

औरंगाबाद जिल्ह्यातील जे विद्यार्थी, विद्यार्थींनी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत आहेत, ज्यांची जन्मतारीख एक मे २०२१ ते ३० एप्रिल २०१३ च्या दरम्यान आहे. तसेच नियमित इयत्ता तिसरी व चौथी उत्तीण झाले आहेत, असे विद्यार्थी प्रवेश चाचणी परिक्षेसाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासंबधी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२० केंद्रावर परीक्षा

प्रवेश चाचणी परीक्षा २९ एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यातील २० परीक्षा केंद्रावर होणाार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती क्षेत्रातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व शाळेतील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे संधी गेली

गत दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षा देण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, आता परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व प्रवेशाची संधी आहे.

ऑनलाईन, ऑफलाईन हाॅलतिकीट सुविधा

नवोदय परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट उपलब्ध करण्यात येतील. हे हाॅलतिकीट ऑनलाईन प्लॅटफार्मवर उपलब्ध असतील तसेच शाळेतूनही विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नेहमीप्रमाणे परीक्षेचे नियम विद्यार्थ्यांना पाळावे लागणार आहेत अशी माहीती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...