आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी पिके सुकली:पैठणच्या उजव्या कालव्यास तात्काळ पाणी सोडा, भारतीय किसान संघाची मागणी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणच्या उजव्या कॅनॉलखाली मोठ्या प्रमाणावर उभी पिके आहेत. उन्हाळी हंगामातील या कालव्याच्या पाणी पाळ्या संपल्या आहेत परंतू पाउस लांबल्याने उभी पिके पाण्याअभावी सुकु लागली आहेत. त्यामुळे पैठणच्या उजव्या कालव्यातुन शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.

पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी या क्षेत्रात अद्यापही पाउस झाला नाही. परिणामी शेतातील उभी पिके सुकु लागली आहेत. तरी संरक्षीत पाणी पाळी म्हणून एका पाणी पाळीसाठी पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पाणी तात्काळ सोडले तरी टेलपर्यंत पाणी येण्यास बरेच दिवस लागतात. याचा विचार करून तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी भारतीय किसान संघ महाराष्ट् प्रांतचे अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...