आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा विसर्ग वाढवला:18 दरवाजातून 28 हजार क्यूसेक विसर्ग; गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 24 तासात नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक येत आहे, त्यामुळे जायकवाडी धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. बुधवारी जायकवाडी मधून केवळ अडीच हजार इतका विसर्ग सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता जायकवाडीचे अठरा दरवाजे दीड फुटाणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जायकवाडीतून 28 हजार 296 इतका विसर्ग करण्यात आला आहे.

या वर्षी 31 वर्षानंतर जायकवाडीचे दरवाजे जुलै महिन्यात उघडण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीचा विसर्ग कायम सुरु आहे.आतापर्यत केवळ चार दिवसाचा अपवाद वगळता जायकवाडीचा विसर्ग सुरु आहे.

जायकवाडीचा विसर्ग वाढवला

बुधवारी जायकवाडी धरणातून केवळ अडीच हजार इतकाच विसर्ग सुरू होता. मात्र नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी मध्ये आवक वाढायला सुरुवात झाली.सध्या जायकवाडी मध्ये 27,140 युसेस इतकी आवक येत आहे. त्यामध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून 36 हजार 134 इतका विसर्ग करण्यात येत आहे.यामध्ये दारणा धरणातून 4864 गंगापूर प्रकल्पातून 5884 तर कडवा प्रकल्पातून 4220 क्यूसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडीतून 56 टीएमसीचा विसर्ग

यावर्षी जायकवाडी धरणातून आतापर्यंत 56 टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे .त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्याच्या निम्म्यापेक्षा अधिक पाणी गोदापत्रात सोडण्यात आले आहे

जायकवाडी धरण गेल्या चार वर्षापासून सातत्याने भरत आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये 1376 दलघमी (49 टीएमसी) पाणी सोडण्यात आले होते. तर 2020 मध्ये 2282 दलघमी( 81 टीएमसी) पाणी सोडण्यात आले होते. तर 2019 मध्ये 2700 दलघमी (95 टीएमसी) पाणी सोडण्यात आले होते. तर 2017 मध्ये 280 दलघमी 9.88 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी महिन्याभरातली आणखी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज पाहता आणखी या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...