आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार पावसाची प्रतीक्षा:जायकवाडी सध्या 33 टक्क्यांवर; उद्योग अन् 450 गावांना चार दिवस पुरेल इतक्या पाण्याचे रोज होतेय बाष्पीभवन

दमदार पावसाची प्रतीक्षा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या पावसाने दांडी मारल्याने बाष्पीभवनाच्या प्रमाणात वाढ

यंदा मान्सूनचे जाेरदार अागमन झाले. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात अाहे. नांदेडचे विष्णुपुरी धरण तर १०० टक्के भरलेही. परंतु जायकवाडी धरणात अद्याप पाणीपातळी वाढली नाही. गेल्या वर्षी १५ जूनला धरणात ३५ टक्के पाणीसाठा हाेता. यंदा ताे ३३ टक्क्यांवर अाहे. बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले अाहे. वाळूज, अाैरंगाबाद, चितेगाव, चिकलठाणा, पैठण एमअायडीसी अाणि शेंद्रा-बिडकीन डीएमअायसीतील हजाराे कंपन्या व ४५० गावांना ४ दिवस पुरेल इतक्या पाण्याचे राेज बाष्पीभवन हाेत अाहे. हे प्रमाण मागील तीन वर्षांतील अधिक अाहे. दरराेज एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन हाेत असल्याचे पाटबंधारे विभागातील सहायक अभियंता संदीप राठाेड यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र २१ हजार ७५० चाै.कि.मी. अाहे. धरण उथळ असल्याने पाण्याचे बाष्प लवकर होते. रोज साधारणपणे १.०५ दलघमी बाष्पीभवन हाेते. दरवर्षी होणाऱ्या बाष्पीभवनाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. सध्याचा पाणीसाठा मुबलक असला तरी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचन बंद करण्यात आले आहे.

सध्या पावसाने दांडी मारल्याने बाष्पीभवनाच्या प्रमाणात वाढ
औरंगाबाद शहराला दररोज १५० दशलक्ष घनमीटर पाणी लागते. पैठण, वाळूज, चिकलठाणा, चितेगाव या औद्योगिक वसाहती व बिडकीन-शेंद्रा डीएमआयसी येथील चार हजार कंपन्यांना २४ तास पुरेल एवढ्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन रोज होत आहे. यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेवासासह इतर ठिकाणी देखील पाणीपुरवठा होतो, जेवढे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात काही भागाला पिण्यासाठी चार दिवस पाणी लागते तेवढ्या पाण्याचे बाष्पीभवन रोज होत आहे.

बातम्या आणखी आहेत...