आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:जेईई मेन्सचे परीक्षेचे हॉलतिकीट जारी; कोविड-19 सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागेल प्रवासाची माहिती

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेईई मेन्सच्या अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in यावरुन डाऊनलोड करता येईल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने फेब्रुवारी अखेरीस जेईई मेन्स परीक्षा 2021 होत आहे. या परीक्षेसाठीचे एडमिट कार्ड (हॉलतिकीट) ऑनलाइन जाहिर करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठीचे पर्याय निवडले आहेत. त्यांनी जेईई मेन्सच्या अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in यावरुन डाऊनलोड करुन घेता येतील.

विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणेच यंदा देखील कोरोनामुळे सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग भरावे लागणार आहे. ज्यात विद्यार्थ्यांना मागील चौदा दिवसात ते कोणत्याही कोरोना संक्रंमित व्यक्तीच्या संपर्कात तर आले नव्हते ना? याबरोबरच तबेतीविषयी देखील सांगायवे लागणार आहे. जसे की मागील काही दिवसात खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी, अंग दु:खी अशी कोणतीही लक्षण न तर नव्हती ना? याबरोबरच ट्रॅव्हल हिस्ट्री देखील सांगावी लागणार आहे. तसे एनटीएने दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.