आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई, नीट अपडेट:नीट आणि जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जेईई मेन्स 18 जुलैपासून तर 26 जुलैला होणार नीट परीक्षा

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) आणि अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी पूर्व परीक्षा (जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स) परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहिर केले. जेईई मेन्स परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान होणार असून, वैद्यकीय परीक्षा नीट ही 26 जुलै रोजी होणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र सीबीएसई आणि आयसीएसईने उर्वरित पेपर लवकरच घेणार असल्याचे म्हणत परीक्षेचे वेळापत्रक दहा दिवस आधी जाहिर करण्यात येईल असे सांगितले तर राज्यमंडळाने मात्र इयत्ता दहावीचा पेपर रद्द केला होता. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या असल्या तरी करिअरच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष होते.  केंद्रिय मनुष्यबळ मंत्रालयाने हे वेळापत्रक जाहिर करुन  विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. तर जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही ऑगस्ट महिन्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...