आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:40 टक्के विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यासाठी जिपची तयारी

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा १३ जूनपासून सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही १२ ते १४ वयोगटातील ४० टक्के विद्यार्थ्यांचा पहिला डोस बाकी असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाला असून शाळांत कोरोना लसीकरण कॅम्प घेऊन मुलांचे लसीकरण करून घेतले जात आहे. १५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण पूर्ण होईल, त्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

कोरोनाची संभाव्य चौथी लाट येण्याचे संकेत राज्य शासन, प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. शाळांमध्ये एकाच वेळी सर्व मुलांना लस देणे सोयीचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पथके नियुक्त करून शाळेमध्ये कॅम्प घेऊन प्रत्येक पात्र विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेतले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...