आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घ्या योजनेचा फायदा:436 रुपयांत 2 लाखांची जीवनज्योती योजना! अपघाती मृत्यू झाल्यास अवघ्या 20 रुपयांत मिळणार 2 लाखांची 'जीवनसुरक्षा'

छत्रपती संंभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्र सरकारच्या वित्तीय विभागाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत पातळीवर जीवनज्योती विमायोजना साठी जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत सहभागी करुन सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर दर बुधवारी शिबीरांचे आयोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी दिली आहे.

ग्रामिण भागात वित्तीय सेवाची माहिती व्हावी यासाठी बँकाच्या वतीने विवीध योजनांची माहिती देण्यात येत आहे. प्रत्येक बँक शाखा त्याच्या सेवा क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये शाखा व्यवस्थापक बँक मीत्र यांच्या माध्यमातून योजनाचा प्रचार करत आहेत.

यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील सरंपच तलाठी ग्रामसेवक अंंगणवाडी सेवीका यांनी नागरिकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृतीसाठी मदत करावी. तसेच जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन बँकाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा मिळणार योजनेचा लाभ

  • अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेमध्ये ४३६ रुपये भरल्यास एका वर्षासाठी १८ ते ५० वयोगटातल्या कुठल्याही व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यु झाल्यास त्याचा दोन लाख रुपयाचा विमा आहे. तर
  • जीवन सुरक्षा योजना मध्ये वर्षाला २० रुपये भरल्यास -१८- ते ७० या वयोगटात यामध्ये - अपघाती मृत्यु झाल्यास दोन लाख रुपये मिळणार आहे.
  • दोन्ही विमा काढल्यास चार लाख रुपयाचा विमा मिळु शकतो.
  • जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय तसेच मंगेश केदार यांनी केले आहे.