आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालनपोषण:महिलांना ऑनलाइन बँकिंगमध्ये ‘जितो’ सदस्या बनवणार आत्मनिर्भर

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब सांभाळणे, मुलांचे पालनपोषण करणे यासोबतच महिला अर्थाजन करून कुटुंबाला आर्थिक हातभारही लावतात. मात्र, इतक्या मेहनतीने जमवलेल्या पैशांचे नियोजन करण्याचा मार्ग माहिती नसल्याने त्या मोठी मजल मारू शकत नाहीत. विशेष म्हणजे ही अडचण फक्त अशिक्षित महिलांची आहे असे नाही तर शिक्षित महिलांची बचत, सोने यापलीकडे जाऊन विचार करत नाही. यासाठी जितो लेडीज विंग प्रामुख्याने महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ देणे, नेटवर्किंग, बँकिंगच्या प्रशिक्षणावर भर देणार आहे, अशी माहिती नवनियुक्त अध्यक्ष डिंपल पगारिया यांनी दिली.

यासाठी प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करणार आहोत. पहिली छाप आपल्या दिसण्यावरून पडते त्यामुळे स्वत:च्या सादरीकरणातील बारकाव्यांवरही मार्गदर्शन आयोजित केले जाणार आहे. आगामी दोन वर्षांसाठी आमचे नियोजन तयार केले आहे. जितोच्या ११६ सदस्य आहेत. दोन वर्षांनंतर या सर्व सदस्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला असेल, असा माझा विश्वास आहे, असेही डिंपल यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...