आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कादंबरी:जे.के. जाधव साहित्य पुरस्काराचे वितरण

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“टिश्यू पेपर’ कादंबरीसाठी डॉ. रमेश रावळकर, “बळीराजा’ कादंबरीसाठी लता बहाकर, “गाव कवेत घेताना’-विजयकुमार मिठे, “धगधगते तळघर’ उषा हिंगोणेकर यांना ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. एमआयडीसी चिकलठाणा येथील राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीला प्रेरणा म्हणून जे. के. जाधव महाविद्यालयाच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण केले जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. के. जाधव होते. निवृत्त अधिकारी जयंत देशपांडे, साहित्यिक सतीश बडवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मंगला वैष्णव, डॉ. भीमराव वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देशपांडे म्हणाले, जाधव यांनी समाजाला अनेक उपक्रम देत प्रेरणा दिली आहे. एखादा समाज पुढारलेला आहे. हे त्या समाजामध्ये साहित्याची निर्मीती व गुणवत्ता या आधारे ठरते. समाज परिवर्तनासाठी शस्त्र-अस्त्रापेक्षा लेखणीच प्रभावी ठरली आहे. त्यामुळे लेखक, पत्रकार, समीक्षक निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यानंतर विविध मान्यवरांनीही भावना मांडल्या. प्राचार्या वैशाली गडे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...