आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकास मंत्रालय:ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण देऊन ‘जन शिक्षण’तर्फे 47 जणांना रोजगाराची संधी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन शिक्षण संस्थान व कौशल्य विकास मंत्रालय यांच्यातर्फे स्किल हब असिस्टंट ब्यूटी थेरपिस्ट, इलेक्ट्रिशियन आणि होम अप्लायन्सेस कोर्सचे प्रशिक्षण देऊन ४७ जणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तयार केले. पंधरवडा समारोपात या सर्वांना स्किल इंडिया प्रमाणपत्र देण्यात आले. औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, अर्चना काळे, मच्छिंद्र पंडित, क्राइस्ट चर्च हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुपमा नाडे, रणधीर गायकवाड यांची उपस्थिती होती. २१ जणांना इलेकट्रिशियन, तर २६ जणांना ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात आले.डेकोरेटिव्ह मास्क, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरणही झाले.

बातम्या आणखी आहेत...