आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक, कवी श्रीकांत भराडे यांचे निधन:वयाच्या 67 वर्षी घेतला अखेरचा श्वास; कर्करोगावर होते उपचार सुरू

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक, कवी व नाटककर श्रीकांत भराडे (रा. कॅनॉट प्लेस, वय 67) यांचे आज रात्री आठच्या सुमारास औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, मुलगा चैतन्य, मुलगी तृप्ती, नातू असा परिवार आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड येथे श्रीकांत भराडे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय विभागात वृत्त संपादकापर्यंतच्या विविध जवाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ‘पाय हरवलेली माणसं’ हा त्यांचा ललित लेख संग्रह चांगलाच गाजला होता. या ग्रंथास अस्मितादर्श पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘आणीबाणीनं पाजलं पाणी’ या नाटकाने, 'काळा आर्य' या काव्यसंग्रहाने व 'दटके'या कादंबरीने श्रीकांत भराडे यांना साहित्यिक म्हणून ओळख दिली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला लिखाणाला प्राधान्य दिले होते.

उपचारादरम्यान मृत्यू

23 जुलै रोजी भराडे यांना एशियन हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय कॅन्सर हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे व त्याचा संसर्ग वाढल्यामुळे आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता परभणी या मूळ गावी भराडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे माध्यम, साहित्य क्षेत्रात हळ-हळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...