आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात 3 ज्येष्ठ पत्रकारांचे देहावसान:पत्रकार अशोक तुपे, माेतीचंद बेदमुथा, सोपान बोंगाणे यांचे कोरोनामुळे निधन

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोपान बोंगाणे, मोतीचंद बेदमुथा, अशोक तुपे - Divya Marathi
सोपान बोंगाणे, मोतीचंद बेदमुथा, अशोक तुपे

दैनिक “लोकसत्ता’चे नगर येथील वरिष्ठ बातमीदार, शेती, पाणी, सहकार व राजकारणाचे अभ्यासक अशोक तुपे (५७), उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद तिलोकचंद बेदमुथा (६९) आणि ठाणे येथील अभ्यासू बातमीदार सोपान बोंगाणे या राज्यातील तीन ज्येष्ठ पत्रकारांचे कोरोनामुळे निधन झाले.

अशोक तुपे
अशोक तुपे यांनी लोकसत्तामध्ये बातमीदार म्हणून कारकीर्द गाजवली. कोरोना उपचारांनंतर ते बरे झाले. परंतु, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सून, आई, तीन भाऊ असा परिवार आहे.

सोपान बोंगाणे
ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. बोंगाणे पुण्यनगरीच्या ठाणे आवृत्तीचे मुख्य प्रतिनिधी होते. यापूर्वी त्यांनी लोकसत्ता व ‘सामना’तही काम केले.

मोतीचंद बेदमुथा
उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद तिलोकचंद बेदमुथा यांचे हैदराबाद येथे कोरोनावरील उपचारांदरम्यान निधन झाले. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी २० वर्षे पत्रकारिता केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या विविध पदांवर ते होते.

बातम्या आणखी आहेत...