आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्पण दिन:विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारांच्या बातम्या पूरक : आ. चव्हाण

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळागळातील प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांच्या बातम्यांची भुमिका महत्वाची असल्याचे मत असे मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. त्याप्रमाणेच पत्रकारांच्या बातम्यांमुळे गावातील पाण्याचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आपण विधीमंडळात मांडू व सोडवू शकलो, असे ते म्हणाले.

खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी दिव्य मराठीच्या डेप्युटी एडिटर दीप्ती राऊत होत्या. या वेळी मो. अय्युब, डॉ. प्रभू गोरे, इरफान जहागिरदार, डॉ. गनी पटेल, माजी नगराध्यक्ष अॅड. एस.एम.कमर, मिठ्ठू पा. बारगळ, विलास चव्हाण, जगन्नाथ खोसरे, देविदास अधाने, मजहर पटेल उपस्थित होते. या वेळी सुनील घोडके, प्रकाश वाकळे, प्रवीण इंगळे, दिनेश अंभोरे, सतीश दांडेकर, ऋषिकेश बोडखे, गजानन फुलारे, विष्णू सुरासे, देवदत्त कोठारे उपस्थित होते.

एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचा कार्यक्रम औरंगाबाद | एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने अटलमत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम झाला. या वेळी रतनकुमार पंडागळे, सेवानिवृत्त माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांची उपस्थिती होती. असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकारांचे स्वागत कार्याध्यक्ष राजपालसिंग अटल, जिल्हाध्यक्ष गणेश पवारयांनी केले. या वेळी मनीष अग्रवाल, बाजीराव सोनवणे, सुजित ताजणे, रमेश वानखेडे, आदींची उपस्थिती होती.

युवा मोर्चातर्फे शहरातील पत्रकारांचा सत्कार सोहळा औरंगाबाद | अटल युवा पर्वअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार सतीश वैराळकर यांच्यासह पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, प्रदीप पाटील, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे विकास राऊत, छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष फेरोज खान, बालाजी सूर्यवंशी, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती. राहुल नरोटे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...