आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनटीएने युजीसी नेट परीक्षेत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या वयोमर्यादेत सुट दिली आहे. आता २८ एेवजी ३१ वयोगटातील युवक अर्ज करु शकतील. यात एनटीएने यात बदल केला आहे. त्यामुळे युवकांचे वय २ डिसेंबर २०२२ पर्यंत ३१ वर्ष असणे आवश्यक आहे.
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. एससी, एसटी, ओबीसी, एनसीएल, ट्रान्सजेंड, महिला उमेदवारांना अधिकतम वयोमर्यादेत पाच वर्षांची सुट दिली आहे. एलएलएम पदवी करणाऱ्यांना तीन वर्षांची सवलत दिली आहे. सध्या युजीसी नेटसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून, १७ जानेवारी राेजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येइल. नेट परीक्षा २१ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत हाेइल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.