आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांच्या खंडानंतर सामने:पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी 'एमजीएम' विद्यापीठाचा संघ जबलपूरला रवाना

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर (मध्य प्रदेश) येथे २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पश्चिम विभागीय अंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादचा १२ सदस्यीय संघ सहभागी होणार आहे. हा संघ गुरुवारी (दि. २४) रोजी स्पर्धेसाठी रवाना झाला. संघाच्या कर्णधारपदी युवा खेळाडू सेवक राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघ प्रथमच सेवकच्या नेतृत्वात खेळेल.

एमजीएम संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. सदाशिव जव्हेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, संघ व्यवस्थापक म्हणून शुभम कावळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील स्पर्धेसाठी संघाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. रेखा शेळके, एमजीएम क्रीडा विभाग प्रमुख डॉ. दिनेश वंजारे, शशिकांत सिंग, नीलेश हरदे आदींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खेळाडूंना किटचे वाटप

आंतर महाविद्यालयीन स्पर्धेला जाणाऱ्या संघाला कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते खेळाडूंना किटचे वाटप करण्यात आले. यात टी शर्ट व शॉट्सचा समावेश आहे. खेळाडूंना विद्यापीठ सर्व सुविधा उपलब्ध करुन देईल. संघाने सुवर्णपदक जिंकून यावे, अशी अपेक्षा कदम यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोनानंतर प्रथमच स्पर्धा

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात स्पर्धा झाल्या नाहीत. यंदा होत असल्याने स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. आमचा सराव चांगला झाला आहे. विजेतेपदाचे आम्ही दावेदार असल्याने थोडा दबावही आमच्यावर असेल. परंतु प्रत्येक सामन्यानुसार विरोध संघ पाहून वेळेवर रणनिती बनवणार आहोत. एक-एक सामना जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. जिंकण्याचा आत्मविश्वास संघात असल्याचे कर्णधार सेवक राठोड याने सांगितले.

असा आहे संघ

कार्तिक थिगळे, अनिकेत थिगळे, कृष्णा गवारे, राहुल भाडाईत, सेवक राठोड (कर्णधार), उमेश शिंदे, अनिकेत शिंदे, सुजल सालकर, करण देशमुख, रुपेश नामदे, देवशिष हागे आणि भागवत पिंपळे. प्रशिक्षक डॉ. सदाशिव जव्हेरी, संघ व्यवस्थापक शुभम कावळे.

बातम्या आणखी आहेत...