दुःखद : आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांचे निधन

  • मागील काही वर्षांपासून कबीर हे कर्करोगामुळे त्रस्त होते

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 10:03:00 AM IST

औरंगाबाद : औरंगाबाद आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर(५२) यांचे २५ मार्च रोजी दुपारी निधन झाले. ते मागील काही वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर शासकीय कर्करोग रुग्णालयात उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नामांतर, खैरलांजी, कोरेगाव भीमा आदी गाजलेल्या प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असायचे. ते एक झुंजार विद्यार्थी नेते होते.


ते डाव्या पक्षांच्या चळवळीत हिरिरीने भाग घेत असत. मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात कोठेही गोरगरीब आणि अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांवर अन्याय झाला की, ते धावून जात आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करत असत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जळगावरोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

X