आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक:भक्तिगीत गायन स्पर्धेत कल्पना गुंटूरकर प्रथम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांमध्ये भक्तिगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात कल्पना गुंटूरकर हिने १५ हजारांचे प्रथम पारितोषिक तर मथुरा राजपूत हिने ७ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले.

दरवर्षी पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेचे बक्षीस वितरण व विवेकानंद संगीत महोत्सवाचे उद्घाटन प्रा.पंडित विजय देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी उपप्राचार्या अरुणा पाटील यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. तृतीय क्रमाकांचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक सुनील रिळे तर उत्तेजनार्थ बक्षीस पुष्पा नेगी, सतीश कुलकर्णी यांना मिळाले. स्पर्धकांना ७ जानेवारी रोजी विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात बक्षीस वितरण करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...