आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात प्रथमच:कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापतींसह 21 जणांचे उमेदवारी अर्ज बाद

प्रतिनिधी | कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 250 उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी बाजार समिती कार्यालयात तीन वाजेपर्यंत पार पडली. दाखल झालेल्या 250 उमेदवारी अर्जात 3 उमेदवारी अर्ज डबल आल्याने त्या तीन अर्जाची न छाननी न करता केवळ 247 उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत बाजार समितीचे सभापती व दिर्घकाळ संचालक राहिलेले राजकुमार हंसराज गंगवाल, अब्दुल जावेद,अब्दुल वाहेद, रमेशकुमार बद्रीनारायण खंडेलवाल या दिग्गजांसह 21 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. तर, 226 अर्ज वैध झाले असल्याची माहिती डी. डी. जैस्वाल यांनी दिली.

छाननीत बाद झालेले उमेदवारी अर्ज

१) अब्दुल जावेद अब्दुल वाहेद, २) राठोड प्रताप रूपा, ३) सोळुंके गणेश विश्वास, ४) खंडेलवाल रमेश बद्रीनारायण, ५) गंगवाल राजकुमार हंसराज, ६) कदम गणेश अप्पाराव, ७) ससे रामभाऊ नथू, ८) ठाकरे मधुकर आधार (वरिल सर्व सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ) ९) पवार मंगलबाई देविदास (सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ) १०) गिरी जगन्नाथ मोहन, ११) गोरे नवनाथ उत्तम ( सहकारी संस्था इ.मा.व मतदारसंघ) १२) थोरात कासाबाई शिवाजी, १३) आव्हाळे सर्जेराव लक्ष्मण, १४) चव्हाण युवराज एकनाथ, १५) संजय विठ्ठल सोनवणे, १६) गायकवाड संदीप अंबादास, १७) भारतीय महेंद्रकुमार सत्यनारायण (वरिल सर्व ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ ) १८) गायकवाड संदीप अंबादास ( आर्थिक दुर्बल घटक ग्रामपंचायत ) १९) अहिरे राजधर प्रकाश (अनुसूचित जाती ग्रामपंचायत ) २०) विभुते कचरू उत्तम ( अनुसूचित जाती ग्रामपंचायत)

२१) अब्दुल मुजफ्फर रफिक (व्यापारी मतदारसंघ )

बाद उमेदवार अपिल करू शकतात

छाननीत बाद झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे अर्ज कोणत्या कारणांमुळे बाद ठरविण्यात आले याबाबत आम्ही आज सर्व उमेदवारांना संध्याकाळ पर्यंत लेखी कळवणार आहोत. त्यांनतर ते छत्रपती संभाजीनगर येथील डीडीआरकडे आपिल करु शकतात, अशी माहिती सहाय्यक निंबधक अर्जना वाडेकर यांनी दिली.

आपिलात जाणार नाही

व्यापारी मतदारसंघात नाव असल्यामुळे शेतकरी म्हणून निवडणूक लढवता येत नाही, असा सहकार कायदा आहे. छाननीत उमेदवार अर्ज टिकणार नाही यांची मला पुर्णपणे कल्पना मला होती. पण आमच्या सहका-यांच्या आग्रहाखातर अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आपिलात काही जाणार नाही, देवगाव रंगारी येथील राजकुमार गंगवाल यांनी सांगितले.