आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:तब्बल पंधरा दिवसांनी उघडला उत्तर भारताला जोडणारा कन्नडचा घाट, पहिल्याच दिवशी 300 दुचाकी-कार धावल्या

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
रस्ता दुरुस्तीनंतर कन्नड घाटातून लहान वाहनांची वाहतूक बुधवारपासून सुरू झाली. - Divya Marathi
रस्ता दुरुस्तीनंतर कन्नड घाटातून लहान वाहनांची वाहतूक बुधवारपासून सुरू झाली.

अतिवृष्टीमुळे ८ ठिकाणी दरडी कोसळल्याने ३१ ऑगस्टपासून बंद असलेल्या कन्नड घाटातील वाहतूक बुधवारपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ३०० वाहनांनी सुरक्षितपणे ये-जा केली. मात्र बस व ट्रक अशा अवजड वाहनांना परवानगी नसल्याने ही वाहतूक शिऊर बंगलामार्गे वळवली आहे. यामुळे औरंगाबादला जाण्यासाठी बस प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. तसेच वेळही जास्त लागत आहे. म्हसोबा मंदिरानजीक सर्वात मोठी दरड कोसळून रस्तादेखील पूर्णपणे खचला असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. तेथे आता साडेपाच मीटरच्या रस्त्याचे काम झाले असून संरक्षक भिंती तुटलेल्या ठिकाणी जवळपास ३०० मीटर भिंतीचे काम सध्या सुरू आहे.

सध्या दुचाकी, कार वाहतूकच सुरू
- म्हसोबा मंदिराजवळ साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता असल्याने तेथे राज्य महामार्ग पोलिसांचा बंदोबस्त आहे. तेथून एका वेळी एकाच गाडीची वाहतूक शक्य आहे.
- सध्या दुचाकी व कार वाहतूक सुरू असून बस, वाळू व उसाचे ट्रक जाऊ नयेत म्हणून रस्त्यावर लोखंडी कमान लावली आहे.
- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा थेट उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावरून रात्रंदिवस हजारो वाहने धावतात. परिणामी हॉटेल, ढाबे तसेच पेट्रोल पंप, वाहनांचे सुटे भाग विक्रीची दुकाने व त्यावर काम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या मजुरांना यामुळे दिलासा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...