आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:दिवाळीपूर्वी कन्नड घाट जड वाहनांसाठी उघडणार; दोन भिंतींचे काम पूर्ण, डांबरीकरणासही प्रारंभ

चाळीसगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर व दक्षिण भारताचे द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्नड घाटाच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. दिवाळीपूर्वीच हा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे कन्नड घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. तेव्हापासून हा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. १५ सप्टेंबरपासून फक्त दुचाकी व लहान कारसाठी हा मार्ग सुरू झालेला आहे.

चाळीसगाव येथील संत सतरामदास लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक राज पुंशी आणि भोजराज पुंशी यांनी सांगितले की, कन्नड घाटात सध्या चार मोठ्या ५० फूट भिंतींचे काम सुरू आहे. त्यापैकी दोन भिंतींचे काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले आहे. लवकरच उर्वरित दोन भिंतींचेही काम पूर्ण होण्याची आशा आहे. आता सांगवी फाटा ते तेलवाडी गावापर्यंतच्या एकूण १५ किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. ९ ऑक्टोबरपासून कन्नड घाटातील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे.