आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कन्नड घाटात बोगद्याऐवजी तीन किमीचा रस्ता फोडणार कोंडी

उमेश बर्गे | कन्नड/चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हत्ती बंगला ते कळंकीदरम्यानचा रस्ता उत्तम पर्याय; साडेपाच हजार कोटी खर्चाच्या बोगद्याचे काम रखडले

कन्नड घाटातील वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनधारक त्रस्त अाहेत. या समस्येवर उपाय म्हणून प्रस्तावित साडेपाच हजार कोटी खर्चाच्या बोगद्याचे काम खर्चामुळे पाच वर्षांपासून रखडले अाहे. त्यामुळे निजाम राजवटीत पाऊलवाट म्हणून ओळखला जाणारा, पाटणादेवीजवळील हत्तीबंगला ते कन्नड तालुक्यातील कळंकीपर्यंतचा तीन किमी लांबीचा रस्ता विकसित केल्यास, कमी खर्चात कन्नड घाट रस्त्याला सक्षम पर्याय निर्माण होऊ शकताे. चाळीसगाव साबां उपविभागाच्या अखत्यारीत, पाटणादेवी-गोरखपूर-चाळीसगाव हा राज्यमार्ग क्र.३८४ अाहे. चाळीसगाव ते पाटणादेवी गेटपर्यंत १४ किमी लांबीचा रस्ता डांबरी आहे. तसेच चंडिकावाडी फाटा-चंडिकावाडी तांडा असा ग्रामीण मार्ग क्र. ९४ सुद्धा पाटणादेवी गेटपर्यंत जातो. पाटणादेवी गेट ते पाटणादेवी मंदिरापर्यंतचा २.२ किमीचा डांबरी रस्ताही सुस्थितीत आहे. तसेच पाटणादेवी मंदिर ते हत्ती बंगलापर्यंत असा दीड किमी रस्ता खडीकरणाचा आहे.

महामार्गाला मिळेल पर्याय प्रस्तावित रस्ता हा चाळीसगाव येथील केकी मूस कला दालन, वालझिरी येथील तीर्थक्षेत्र व श्रीक्षेत्र पाटणादेवी (चंडिकादेवी) व संभावित भास्कराचार्य यांची गणित नगरी या ३ स्थळांना जोडणारा रस्ता आहे. त्याचप्रमाणे देवळी, डोणदिगर, हिरापूर, गणेशपूर, पाटणादेवी प्रजिमा क्र. ४१ हा मार्गही या रस्त्याला जोडतो. नांदगाव(जि. नाशिक) ते चाळीसगाव या मार्गावरील वाहतूक चाळीसगावला न येता परस्पर या रस्त्यावरून जाऊ शकते. सध्याचा महामार्ग क्रमांक २११ (आताचा क्र.५२) येथून पाटणादेवीला जाणारा राज्यमार्ग ३८३ देखील आहे. हत्ती बंगला ते कळंकी हा मार्ग विकसीत झाल्यास महामार्ग २११ ला पर्यायी मार्ग मिळेल.

१ कन्नड घाटात सध्या वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. २ हत्ती बंगला ते कळंकीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास घाटातील वाहतुकीचा भर कमी होईल. दोन महिन्यांत काम होऊ शकते पूर्ण ^केवळ तीन किमीचा हा रस्ता केल्यास तो अतिसुरक्षित, कमी खर्चाचा व पर्यटनाला चालना देणारा ठरेल. रस्त्याचे काम सुरू झाले तर दोन महिन्यांत हा रस्ता तयार होऊन खुला होऊ शकतो. -एन.पी.सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्व.बांधकाम विभाग, जळगाव

बातम्या आणखी आहेत...