आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कन्नड घाट दुरुस्तीसाठी लागणार 15 दिवस; महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक अरविंद काळे यांची माहिती

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नडच्या औट्रम घाटात मंगळवारी तब्बल ३५ ठिकाणी दरड कोसळली, अजूनही असंख्य ठिकाणी मोठमोठे दगड कोसळण्याच्या मार्गावर आहेत. घाटात नेहमी दरड कोसळते. अनेक वेळेस या घाटात वाहतूक कोंडी होते. घाटात चार ठिकाणी रस्ता खचला आहे. या रस्त्याला खालून काँक्रिट करून कठडे करावे लागणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.

दरम्यान, पुढील १५ दिवस औरंगाबादहून जाताना शिऊर बंगला व्हाया नांदगाव व चाळीसगावहून येताना याच मार्गाने परत यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहतूक पूर्ण बंद राहील. मंगळवारी कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. घाटात मंगळवारी पहाटे ४ मोठे तर ३१ मध्यम व किरकोळ दरडी कोसळल्या. अजूनही अनेक ठिकाणी मोठे दगड पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे हा घाट अजूनच धोकादायक बनला आहे. हे सर्व पडू शकणारे दगड काढणे गरजेचे आहे.

बुधवारी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, व्यवस्थापक महेश पाटील, सहायक अभियंता आशिष देवतकर, महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, अशोक दाबके, अवचित वळवळे, सुरेश सुरे, नंदकुमार शेजवळ, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आदींनी पाहणी केली

बातम्या आणखी आहेत...