आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती जाहीर:कण्व ब्राह्मण समाजातर्फे 65 गुणवंतांचा सत्कार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा कण्व ब्राह्मण समाजातर्फे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, पाचवी, आठवी, दहावी व बारावी तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षणात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात संस्थापक सदस्य डॉ. अनंत जयपूरकर, कृष्णा एज्युझोनचे अभिजित धर्माधिकारी व ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पिंपळवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजित धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना वाट कितीही बिकट असली तरी ध्येयनिष्ठ होऊन कठोर परिश्रम करावेत असे सांगितले. भालचंद्र पिंपळवाडकर यांनी विद्यार्थ्यांनी चाकोरीबद्ध करिअर न करता काही हटके करावे, आपल्यातील कमतरता दूर करून सतत प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रतिवर्ष पाच हजारांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच पहिल्या वर्षांचा धनादेशही संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रास्ताविक समिती अध्यक्ष अशोक भाले, परिचय धनंजय सिमंत व सविता आचार्य यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...