आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 मार्च रोजी येणार:कपिलच्या ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर रिलीज: साकारली डिलिव्हरी बॉयची भूमिका

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. आगामी ‘झ्विगॅटो’ या चित्रपटामुळे कपिल सध्या चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. चित्रपटात कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कपिल शर्माने इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर रिलीज केला आहे. ‘टिंग टाँग.. तुमचा ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर डिलीव्हर झाला. कृपया रेटिंग द्यायला विसरु नका,’ असे कॅप्शन कपिल शर्माने व्हिडिओला दिले आहे.

या चित्रपटात कपिल शर्मा एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामीने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका वठवली आहे. ‘मजबूर है इसी लिए मजदूर है...’ हा कपिल शर्माचा या ट्रेलरमधील डायलॉग खूप काही सांगून जातो. ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली. आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी सर्वसामान्य व्यक्ती रात्रंदिवस काम कसे करतो. हे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...