आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेरचा प्रवास:रेल्वेनेच चिरडले, मृतदेहांचा अखेरचा प्रवासही रेल्वेनेच..! मृत कामगारांची नव्हती नोंदणी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • होतं नव्हतं सगळं गेलं... सांगा साहेबा काय करावं...

चालत का होईना पण त्यांना घरी पोहोचायचे होते मात्र नियतीच्या मनात दुसरेच काही होते. १६ मजुरांच्या कुटुंबीयांवर आता त्यांचे मृतदेह पाहाण्याची वेळ आली आहे. करमाडजवळ झालेल्या अपघातात ज्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले, त्या मजुरांचे मृतदेह रात्री रेल्वेनेच त्यांच्या गावाकडे रवाना झालेे. ही शोकांतिकाच.

शुक्रवारी रेल्वे स्टेशनचा परिसर सुन्न झाला होता. ज्यावेळी रुग्णवाहिका या मृतदेह घेऊन आल्या त्यावेळी साऱ्यांचेच डोळे पाणावले. इंजिना मागे असलेल्या डब्यामध्ये हे सोळा मृतदेह ठेवण्यात आल आहेत.यातील सहा मृतदेह चांगल्या अवस्थेत होते तर इतर १० मृतदेह मात्र रेल्वे खाली आल्यामुळे अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते. मध्यप्रदेशातून आलेल्या पथकाने जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे मृतदेह या विशेष रेल्वेने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघाती मृत्यूचा तपास करताना ज्या बाबी समोर येतील त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती मोक्षदा पाटील यांनी दिली.

चौकशी समिती केली नियुक्त

अपघाताची चौकशी करण्यासाठी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. यात तहसीलदार,कामगार अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांचा समावेश आहे. तीन दिवसांत ते अहवाल देतील.

घाबरू नका
जे लोक या घटनेत मृत झाले आहेत ते रिलीफ कॅम्प मधील नव्हते किंवा त्यांनी आमच्याकडे पाससाठी संपर्क केलेला नव्हता. हे मजूर कुणालाही न सांगता निघून गेले. ज्यांना आपल्या गावी जायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करतो आहोत. घाबरू नका. रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी,जालना.

मृत कामगारांची नव्हती नोंदणी

परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था केली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून ४ मे पासून त्यांची ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी केली जात हाेती. शिवाय गुरुवारी २२८ मजुरांना जालन्याहून औरंगाबादला सोडण्यात आले होते. परंतु, मृत कामगारांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी केली नव्हती.

होतं नव्हतं सगळं गेलं... सांगा साहेबा काय करावं...

करमाडजवळ झालेल्या अपघातानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृतदेह आणि जखमींना आणण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो मैल प्रवास करून घरी परतणाऱ्या या मजुरांचा प्रवास अखेर घाटीमध्ये विसावला. जणू त्यांचे पार्थिव उपस्थितांना प्रश्न करत होते. होतं नव्हतं सगळं गेलं... सांग साहेबा काय करावं...

बातम्या आणखी आहेत...