आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे बुधवारी पहाटे औरंगाबादमध्येही पडसाद उमटले. उद्धव गटाच्या युवा सेनेने कर्नाटक महामंडळाच्या बसला, तर मनसेने कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासले. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास युवा सेनेचे सहा ते सात पदाधिकारी मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचले. त्यांनी कर्नाटक महामंडळाच्या एका बसला लक्ष्य केले. चालकासमोरील काचेवर शाई फेकली आणि मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
हा प्रकार एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर झाला. दुपारी मनसेचे अनिकेत निल्लावार, गणेश सोळुंके पाटील, सुरेंद्र वाडेकर, चंदू नवपुते, नीरज बरेजा, बाळू शिरसाट आदींनी समर्थनगर येथील कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासले. त्यांनीही घोषणाबाजी केली. त्यांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केल्याचा दावा मनसेचे शहर जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर यांनी केला. मात्र, क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती दिली. दरम्यान, आज दिवसभर पोलिस सुरक्षित कर्नाटककडे बस रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.