आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान औरंगाबादचे कशिश भरड, श्रेयस जाधव शनिवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत राैप्यपदकाचे मानकरी ठरले. या दाेघांनी दुसऱ्या दिवशी तलवारबाजीच्या सेबर प्रकारात पदकाचा बहुमान पटकावला. तसेच यजमान औरंगाबाद संघ इप्पीच्या सांघिक गटात राैप्यपदक विजेता ठरला. यादरम्यान नागपूरच्या श्रुती आणि काेेल्हापूरच्या धनजंय जाधवने सेबरमध्ये वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली आहेत. नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी सर्वाेत्तम कामगिरीतून शनिवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचा बहुमान पटकावला. या दाेघींनीही ट्रायथलाॅनमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि राैप्यपदकाची कमाई केली. तसेच जालन्याच्या वेस्ट झाेन चॅम्पियन तिरंदाज तेजल राजेंद्र साळवेने अमरावतीमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष्य यशस्वीपणे भेदले. वर्ध्याच्या अंगद इंगळेकरने पुरुषांच्या ट्रायथलॉन क्रमवारीत पुण्याच्या पार्थ मिरगे आणि कोल्हापूरच्या हृषीकेश पाटील यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.
फुटबॉल स्पर्धेत, पुण्याचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ संबंधित अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दुहेरी मुकुट मिळवण्याचे उद्दिष्ट असेल. आता या संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. तिरंदाजीत नाशिकच्या पुरुष व अमरावतीच्या महिलांनी रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदके जिंकली, तर पुण्याच्या पुरुष व महिलांनी कंपाउंडमध्ये २ सुवर्णपदके जिंकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.