आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:महागामीच्या 15 शिष्यांकडून कथ्थक; ओडिसीचे सादरीकरण

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागामी गुरुकुलतर्फे घेण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमात १५ शिष्यांनी कथ्थक, ओडिसी नृत्याचे सादरीकरण केले. त्यांच्या पदन्यासाचे संचलन, भावमुद्रांतील नजाकतीला मान्यवरांनीही दाद दिली. महागामीच्या शारंगदेव सदनमध्ये नृत्यांचा हा नजराणा रसिकांनीही अनुभवला. या वेळी गौरी शर्मा उपस्थित होत्या. त्यांनी लखनऊ घराण्याच्या परंपरा सादर करत मार्गदर्शन केले.

केरळच्या भद्रा मेनन, बंगळुरूच्या सोम्या, साक्षी देशपांडे, दिल्लीच्या हरप्रीत कौर, चारू आनंद, अंतरा दत्ता, राधा जहागीरदार, सिद्धी सोनटक्के यांनी कथ्थक केले. अदिती मित्रा, शीतल भामरे, समृद्धी आणि वेदा, भार्गवी मेठेकर, वैभवी पाठक, ऐश्वर्या मुंदडा यांनी ओडीसीतून मोहिनी घातली. मोहन बोंडे यांनी मार्गदर्शन केले.महागामीत विविध ठिकाणच्या कलावंतांना, अभ्यासकांना निमंत्रित करतो. यातूनच शिष्यांना कलेतील वैविध्य, त्यामागील विचार कळतात, संचालिका पार्वती दत्ता म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...