आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत:कौस्तुभ, भूमिका, अर्णव, साक्षी  चॅम्पियन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपलिका महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा क्रीडाधिकारी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत कौस्तुभ वाघ, अर्णव तोतला, भूमिका वाघले, साक्षी चव्हाण, वेद जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त स्वप्निल तांगडे, आनंद थोरात, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सहभागी शाळांना देखील विशेष पुरस्कार देण्यात आले.

विजेते खेळाडू -पहिली ते चौथी गट कौस्तुभ वाघ, शुभ समदाणी, देवांश तोतला. मुली - भूमिका वाघले, देवांश्री गावंडे, अवनी नवले. -५ ते ७ वी - अर्णव तोतला, तनय कवाळे, आदित्य पवार. मुली - केतकी भगत, पलक सोनी, धनश्री गावंडे. -८ ते १० वी - वेद जाधव, आर्यन बहुरे, वेद संधानशी. मुली - साक्षी चव्हाण, करुण्या वाघले, राधिका तिवारी. महिला - अर्चना सोनवणे, प्रीती समदाणी, किरण चव्हाण. -उत्कृष्ट शाळा शहर गट - रिव्हरडेल स्कूल, नाथ व्हॅली स्कूल, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, चाटे इंग्लिश स्कूल.

बातम्या आणखी आहेत...