आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १७ आणि १८ डिसेंबरला दोनदिवसीय सोहळ्याचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा होईल. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक ज.वि पवार, दिल्लीचे दिलीप मंडल, अमेरिकेचे सूरज येंगडे यासह रॅपर विपिन तातड यांची ‘रॅप टोली’ विशेष आकर्षण आहे.
असे आहेत आजचे कार्यक्रम शनिवारी सकाळी सागर चक्रनारायण, भाग्यश्री अभ्यंकर यांची भीमगीते - १०.३० वाजता रतनकुमार पंडागळे, रमेशभाई खंडागळे, श्रावण गायकवाड, राजेंद्र गोणारकर, अतिष बनसोडे आणि डॉ. उत्तम अंभोरे - ‘पँथर चळवळ’ या विषयावरील परिसंवाद वीरेंद्र गणवीर यांचे “गटार’ नाटक- दुपारी १ वाजता ‘भारतीय संविधान’ या विषयावर पवनकुमार शिंदे, महेश भोसले, बोधी रामटेके, राहुल सावळे - दुपारी ३.३० वाजता कविसंमेलन- सायंकाळी ५ वाजता होईल. ‘स्त्री चळवळ’ या विषयावर रुक्मिणीबाई सातपुते, मुंबईच्या माया बनसोडे, योगिनी पगारे, वर्ध्याच्या वनश्री वनकर, सोनाली मस्के, सुनीता सावरकर चर्चा करतील- सायंकाळी ६ वाजता ‘सिनेमा आणि नाटक’ या विषयावर परिसंवाद- रात्री ९ वाजता संजय मोहाड, स्नेहल प्रधान प्रबोधन ग्रुपच्या माध्यमातून भीमगीते सादर करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.