आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कळमनुरी तालुक्यातील कवडा, गुंडलवाडी दोन गावे सील, गावात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करणार

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील कवडा व गुंडलवाडी या दोन गावांमध्ये एकूण सात रुग्ण तर औंढा तालुक्यातील चंदगव्हाण येथे एक रुग्ण असे एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  त्यामुळे सध्या कवडा व गुंडलवाडी ही दोन गावे मंगळवारी (ता. २३) सील करण्यात आली आहेत.

कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील सात जण मजुरीच्या कामासाठी मुंबई येथे गेले होते. त्यानंतर मंगळवार तारीख १६ येथील सात जण गावी परतले होते. त्या सर्वांना विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल नुकताच शासकीय रुग्णालयात प्राप्त झाला असून त्यापैकी पाच जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कवडा हे गाव सील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय गुंडलवाडी येथील दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे गाव देखील सील करण्यात आले आहे. याशिवाय औंढा तालुक्यातील चंदगव्हाण येथील एक व्यक्ती उपचारासाठी औरंगाबाद येथे गेला होता. त्यानंतर गावी परतल्यानंतर त्याचा स्वॅब नमुना घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या कवडा व गुंडलवाडी ही दोन गावे मंगळवार  सील करण्यात आली आहेत . या गावांमधून जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाच  काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान तीन गावातून आठ जण पॉझिटिव्ह आल्यामुळे आता एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २५ झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...