आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षवाढीसाठी लक्ष्य मराठवाडा:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सभेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष वाढवण्यासाठी के चंद्रशेखर यांनी आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलेय.

राज्यात नव्यानेच एन्ट्री केलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बीआरएस पक्षाच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता 24 एप्रीलला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पक्षवाढीसाठी जोरात हलचाली

प्रादेशिक पक्ष असणाऱ्या बीआरएस पक्षाला ऑक्टोबर 2022 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. दरम्यान, याची सुरूवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. केसीआर यांनी राज्याच्या अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात येण्याची गळ घातली आहे. यानंतर बीआरएसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना आणि माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे अभय चिकटगावकर यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला होता. 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते या पक्षात जाणार याची चर्चा पाहायला मिळत आहे.

संबंधित वृत्त

राजकारण:मराठवाडा- विदर्भात शेतकरी संघटनेचे नेते ‘बीआरएस’च्या गळाला‎; मविआला निवडणुकीत बसू शकेल फटका

महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.‎ चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र‎ समिती (बीआरएस) पक्षामध्ये‎ प्रवेशाचे सोहळे घेतले जात आहेत.‎ शरद जोशी यांच्या शेतकरी‎ संघटनेमधील पदाधिकाऱ्यांना‎ ‘बीआरएस’ने मोहिनी घातल्याचे चित्र‎ आहे. वाचा सविस्तर