आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविमान प्रवास करताना सर्वात आवश्यक सूचनांपैकी एक म्हणजे, फोन एअरोप्लेन मोडमध्ये ठेवणे. आपल्याला इतरत्र आवश्यक ठिकाणी असे करण्यास सांगितले जाते. सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये एव्हिएशनचे प्रमुख प्रा. डॉग डुरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे...
{फोन सिग्नलमुळे विमानाच्या दिशेवर परिणाम होतो का? होय, प्रवाशाकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून विमान उड्डाणादरम्यान त्याची नेव्हिगेशन सिस्टिम म्हणजे, दिशा निश्चित करणाऱ्या भागावर परिणाम करू शकते. विमानाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक(विद्युत चंुबकीय) क्षेत्रावर परिणाम करण्याच्या दृष्टीने पाहिले जाणाऱ्या भागात प्रवाशाचे डिव्हाइस तेवढ्याच फ्रिक्वेन्सी बँडमध्ये एक सिग्नल सोडू शकतो. मात्र, अनेक संशोधनात हेही दिसून आले की, उड्डाणाच्या क्रिटिकल फेजशिवाय(टेकऑफ आणि लँडिंग) काम्प्युटर्स किंवा मोबाइल आदींचा फार फरक पडत नाही. {डिव्हाइस अडचण निर्माण करतात का? २०२१ मध्ये विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २२० कोटींपेक्षाही जास्त होती. विमान सुरक्षेची जबाबदारी असणारे लोक यामुळे चिंतित आहेत. वायरलेस मोबाइल नेटवर्क टॉवर्सच्या साखळीने जोडलेले असतात. अशात लँडिंग वा टेकऑफच्या वेळी सतत मोबाइल वा वायरलेस नेटवर्कच्या वापराने ग्राउंड नेटवर्क ओव्हरलोड होऊ शकते. आणि जेव्हा मोबाइल नेटवर्कचा विषय येतो तेव्हा 5जी नेटवर्क विमान कंपन्यांसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. {क्रूच्या अडचणींमुळे एअरोप्लेन मोड अनेक मोठ्या कंपन्या आता प्रवाशांना वायफायची सुविधा देतात. प्राथमिक स्तरावर हे ठीक आहे. मात्र, हे फ्लाइट चालक दलासाठी चिंतेचा विषय आहे. २०० लोकांच्या फ्लाइटमध्ये लोक एकाचवेळी फोनवर बाेलू लागल्यास किंवा आवश्यक मिटिंगमध्ये सहभागी झाल्यास क्रूला सेवेसाठी सतत प्रतीक्षा करावी लागू शकते. यामुळे “एअर रेज’च्या(हवेत संतप्त होणे) घटना वाढल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.