आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता:नि:पक्ष, नि:स्वार्थ मैत्रीसाठी मन खुले ठेवा, त्यातूनच शांतता : जहागीरदार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजचा काळ वेगाचा आणि संपूर्ण जगाला काही क्षणांत एकमेकांशी जोडणारा आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या या मैत्रीला अधिष्ठान नाही. त्यामुळे नि:पक्ष आणि नि:स्वार्थ मैत्रीसाठी मन खुले ठेवा. याच मैत्रीतून माणसाला शांतता प्राप्त होईल, असा उपदेश योगी डिव्हाइन सोसायटीचे दीपक जहागीरदार यांनी दिला.

शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मैत्री सुमिरण पर्वाच्या समारोपाप्रसंगी जहागीरदार बोलत होते. ते म्हणाले,‘ फ्रेंडशिप ही फक्त दोन व्यक्तींमध्ये होत असते व त्याच्या चतु:सीमा त्या दोघांपुरत्याच मर्यादित असतात. परंतु फ्रेंडलीनेस म्हणजे जी व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल, त्याच्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण वागणे आवश्यक आहे. मग ती व्यक्ती कोणीही असो.’ या वेळी उद्योजक हर्षवर्धन जैन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गिरजाराम हाळनोर, पीठाधीश्वर महंत १०८ प्रकाशदासजी महाराज उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...