आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच:केशवराव धोंडगे म्हणाले होते - 'शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती'!

मनोज साखरे I औरंगाबादएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

मराठवाड्याचा ढाण्या वाघ, जेष्ठ स्वतंत्र सेनानी आणि शेकापचे ज्येष्ठ केशवराव धोंडगे यांचे आज निधन झाले. त्यांचे आणि शरद पवारांचे राजकीय संबंध सर्वश्रूत आहेत. 'शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच आहेत.' संसदीय राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेडला झालेल्या सत्कार समारंभात पवारांविषयी केलेले भाष्य आजही तेवढेच चर्चेत आहे.

पवारांचा घेतला होता मुका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाले. सहा वर्षांपुर्वी नांदेड विद्यापीठाकडून मानद डी लिट पदवी देवून पवारांचा गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी व्यसपिठावरच पवारांचा मुका घेतला.

पवारांनी दिली होती ही प्रतिक्रीया

केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांचा मुका घेतला. त्यानंतर पवारांचीही मार्मिक प्रतिक्रीया होती. “बरं झालं केशवरावांनी जाहीर कार्यक्रमात मुका घेतला. मला घरी सांगता तरी येईल, ते केशव धोंडगेच होते. नाहीतर, माझी पंचाईत झाली असती” पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

परखड भूमिका, आक्रमक भाषा

केशवराव धोंडगे यांचे भाषेवर प्रभुत्व होते. त्यांची भुमिका परखड असायची. त्यांनी 'शरद पवारांबद्दल मत व्यक्त करताना त्यांची बारामती म्हणजे भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच आहेत असे पवारांसमक्ष भाष्य केले होते.

सळो की, पळो

शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. केशवराव धोंगडे यांचे. परखड भूमिका व आक्रमक भाषेला अभ्यासू व आक्रमक आंदोलनाची जोड ते देत होते. ते सरकारला सळो की, पळो करून सोडत.

'मन्याड खोऱ्याचा वाघ'

'मन्याड खोऱ्याचा वाघ' अशीही त्यांची ओळख आहे. मन्याड धरणाच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन कसे आटोक्यात आणावे, अशी चिंता 1959 मध्ये नांदेडचे पोलिस अधीक्षक असलेले जे. एफ. रिबेरो यांनाही पडली होती. रिबेरो यांनी त्यांच्या 'बुलेट फॉर बुलेट'या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. अनेकांशी जाहीर वादविवाद करणारे केशवरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे 'आली अंगावर घेतली शिंगावर' असेच आहे.

मराठवाड्याचा ढाण्या वाघ हरपला:शेकाप'चे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन, विधानसभेत गाजली होती भाषणे

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (येथे वाचा सविस्तर)

एक धुरंदर राजकारणी

 • नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी, डोंगराळ कंधार विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार
 • नांदेड लोकसभा मतदारसंघातून एकदा खासदार म्हणून त्यांनी संसदीय कारकीर्द गाजविली.
 • केशवराव धोंडगे यांची विधानसभेतील भाषणे सरकारवर आग ओकायची.
 • इरसाल म्हणींचा वापर करत ते सरकारला सळो की, पळो करून सोडत.
 • ते लोकनेते आणि विद्वान असल्याची प्रचीती त्यांच्या 40 पुस्तकांवरून येते.

1972 चा दुष्काळ, रोजगार हमी योजना, कंधार येथे एमआयडीसीची स्थापना, शिक्षण संस्थांची स्थापना, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भालकी सत्याग्रह, गुराखी मुक्ती परिषद व गुराखी साहित्य संमेलन, दमकोंडी सत्याग्रह, 'साप्ताहिक जयक्रांती', असे मोठे कार्य त्यांचे आहे.

माझा विचार थकणार नाही

'आज साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवादी विचाराची गरज आहे. आता शरीर थकले; पण माझा विचार कधी थकणार नाही,' असे शंभरी गाठताना काढलेले उद्गार त्यांच्या, परिवर्तनवादी विचारांवरील निष्ठाच आहे.​​​​

केशवरावांची शरद पवारांवर टोलेबाजी...

 • शरद पवारांची बारामती म्हणजे 'भानामती' आहे. - माणसं फोडण्याचे कौशल्य पवारांना चांगलेच अवगत.
 • कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतील, याचा अंदाज देखील लावता येत नाही.
 • नारदमुनीसुद्धा पवारांची बरोबरी करु शकत नाही, पवार बिना चिपळ्याचे नारद
 • मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्यासाठी पवारच आग्रही होते.
 • शरद पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते, त्यांनाही पवारांनीच राजकारणातून संपवले.
 • आणीबाणीत पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्र वेगळे असते. परंतु, त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नव्हती, म्हणून पवार सत्तेला चिकटून बसले, असा टोला केशवरावांनी पवारांना लागवला होता.
 • पवारांना एवढ्या डिलीट पदव्या मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का? असा चिमटाही धोंडगेंनी यावेळी काढला होता.
बातम्या आणखी आहेत...