आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो मिनिस्टर:खडसेंचे उत्तर की राष्ट्रवादीवर टीका?

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ. एकनाथ खडसेंनी जामनेरात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजेरी लावली. भाषणाआधी एक कार्यकर्ता मंचावर आला अन् खडसेंच्या हातातील माइक हिसकावले. खडसेंनी त्याला त्यांच्या शैलीत उत्तर दिले. जसजशी संध्याकाळ होते. घरी जाण्याची घाई होते. एका बाजूला घरी जायचे असते, दुसऱ्या बाजूला तिकडे जायचे असते. अब तो मजा है! हमने अभी तक नही छोडी. निवडणुकीमध्ये पाहिलं मी तुम्हाला... एक किलो मटण अन् बाटली आली, हो गया काम. आता हे खडसेंचे उत्तर होते की राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर टीका, याचा शोध सुरू झाला आहे.

महाराष्ट्राचं िनषेधराष्ट्र करून टाकलंय नेत्यांनी भल्या, दाट थंडीचा विळखा घट्ट होत असताना महाराष्ट्रातील राजकारण नेहमीप्रमाणे तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर दात ओठ खाऊन तुटून पडत आहेत. सत्ताधारी विरोधकांच्या चुका शोधून त्यांचे पुतळे फुकण्यात मग्न झाले आहेत. सकाळी उठलं की कोण काय बोललं, कोण काय नाही बोललं हे शोधायचं आणि लगेच आंदोलन जाहीर करून टाकायचं, असं सुरू आहे. त्यामुळे जुन्या पिढीतील वैतागलेले पदाधिकारी म्हणाले की, चांगल्या कामासाठी कोणी मिळतच नाही. सगळे निषेधातच बिझी. महाराष्ट्राचं िनषेधराष्ट्र करून टाकलंय या नेत्यांनी.

आणखी दुचाकी मागवा... मनपा आयुक्त म्हणून काम करताना आस्तिककुमार पांडेय यांनी चमकोगिरीची कामगिरी बजावली. स्वत:सोबत अनेक नेत्यांनाही चमकावले. आता जिल्हाधिकारी झाल्यावरही ते त्याच दिशेने चालत आहेत. परवाच्या दिवशी त्यांनी दुचाकीवरून पाठलाग करत अवैध वाळूचा ट्रक पकडला. पण केवळ एक ट्रक पकडून काय होणार? इतर अनेक धंदे राजरोस सुरू आहेत. ते बंद करण्यासाठी विशेष बाब म्हणून पांडेय कदाचित आणखी दुचाकी मागवतील. सरकारी खर्चातून.

जाधवांचे निमंत्रण : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणजे कायम वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. दर दोन-तीन महिन्यांनी ते काहीतरी वक्तव्य करतातच. मात्र, त्यातून कधी कधी लोकांच्या हिताच्या गोष्टीही समोर येतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना एक आवाहन केले. त्यात ते म्हणतात की, रावसाहेबांना आगामी विधानसभेत कन्नड जिंकायचे असेल तर कन्नडला रेल्वे आणा. या आवाहनात खोच, टोमणा, टोला असला तरी त्यांनी कन्नडकरांची भावना व्यक्त केली हे तेवढेच खरे आहे.

बातम्या आणखी आहेत...