आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री कराडांची अनोखी शिष्टाई:आमदार शिरसाट आमच्या मागे येतील, आम्ही ओरिजनल आहोत; शिवसेना नेते खैरेंचा चिमटा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप्पाच्या विसर्जनासाठी आज राज्यात धावपळ सुरू आहे. या गडबडीत औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये एक छान असा किस्सा घडला असून, राजकारण आणि सण वेगवेगळे असतात हे जाणवले.

नेमके प्रकरण काय?

औरंगाबाद शहरातील संस्थान गणपतीच्या मिरवणुकीत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे सोबत कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, दोघांनीही एकमेकांसोबत बोलणे टाळले आणि एकामागोमाग चालत होते. यावेळी दोघांनीही एकमेकांना पाहिले नाही. हे लक्षात येताच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पुढे येत चंद्रकांत खैरेंना मागे ओढले. यानंतर त्यांनी खैरे यांना संजय शिरसाट यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, खैरे शिरसाट यांच्या बाजूला उभे राहायला तयार नव्हते. तरीही खैरेंना भागवत यांनी ओढलेच. यानंतर खैरे यांनी शिरसाट यांच्याकडे पाहून हास्य केले. यावर शिरसाट यांनीही खैरेंकडे पाहून स्मित हास्य केले. त्याच्याकडे चला अशी ऑफरही यावेळी हसताना डॉ. भागवत कराड यांनी चंद्रकांत खैरेंना दिली. मात्र, आम्ही ओरिजनल आहोत. त्यांनी आमच्या मागे यावे म्हणत चंद्रकांत खैरे पुढे निघून गेले.

आधी काय घडले होते?

काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी औरंगाबादेत समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी सूत्रसंचालन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, त्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे व खासदार इम्तियाज जलिल यांचा सत्कार केला. शिरसाट हे जलील यांच्या बाजूलाच बसलेले होते. त्यामुळे जलील यांच्यानंतर आपले स्वागत होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, सूत्रसंचालकाने चंद्रकांत खैरे यांचे नाव पुकारले. खैरे यांचे नाव पुकारताच शिरसाट ताडकन उभे राहिले व याबद्दल नाराजी केली. मात्र, याचवेळी खैरे यांनी शिरसाट यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत हसत हसत सत्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही शिरसाट यांचे तातडीने स्वागत करण्याची सूचना सूत्रसंचालकाला दिली.

या सर्व प्रकारावर शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व 'प्रोटोकॉल आहे की नाही?', असा सवाल केला. या रागातच ते कार्यक्रमातून जाण्यासही निघाले. मात्र, बाजूलाच बसलेल्या इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांचा हात धरून त्यांना खाली बसवले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, शिरसाट यांच्या चेहऱ्यावरील राग यावेळी स्पष्ट दिसत होता.

बातम्या आणखी आहेत...