आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:चारदा खासदार राहिलेल्या खैरेंना एक कोटीत किती शून्य हे माहीत नाही; खासदार इम्तियाज यांनी उडवली खिल्ली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने मला लोकसभेत पराभूत करण्यासाठी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये दिले, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जालन्यात केला होता. त्यावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध थांबण्यास तयार नाही. वंचित बहुजन आघाडीने खैरेंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला.

त्यावर माघार घेत खैरेंनी ‘वंचित’ला क्लीन चिट देत मला एमआयएम म्हणायचे होते, असे घूमजाव केले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंना एका कोटीत किती शून्य असतात हेच माहिती नाही,’अशी टोलेबाजी करत बुधवारी आरोपाची खिल्ली उडवली. इतकेच नव्हे तर मला एक नव्हे, दहा हजार कोटी रुपये खैरेंनीच आणून दिले. त्यातील दोन हजार रुपये चहा-पाण्यासाठी काढून घेतले, असेही ते म्हणाले.

भाजपने रसद पुरवल्यानेच माझा लोकसभेत पराभव
दोन वर्षांपूर्वी माझा लोकसभेत पराभव करण्यासाठी भाजपवाल्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये दिले होते. भाजपकडून रसद पुरवली गेल्यानेच माझा निवडणुकीत पराभव झाला.
- चंद्रकांत खैरे, जालना येथे

अब्रुनुकसानीचा दावा ठोकू
खैरे यांनी उगाच हवेत बोलणे ताबडतोब बंद करावे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पैसे घेतल्याचे पुरावे द्यावेत, नाहीतर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा त्यांच्याविरोधात ठोकू.
- फारुख अहेमद, प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

खैरेंचे मानसिक संतुबिघडले
पराभवामुळे खैरेंचे मानसिक संतुलन बिलन घडले आहे. त्यांनी आरोप करण्यापूर्वी ठोस पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी. नाहीतर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू.
- अमित भुईगळ, महासचिव, वंचित बहुजन आघाडी

एमआयएमने प्रकाश आंबेडकरांना फसवले
वंचित आघाडीविषयी जे बोललो ते शब्द मागे घेतले आहेत. तसे त्यांच्या नेत्यांनाही सांगितले. माझ्या बाजूने हा विषय संपला आहे. माझा राग त्यांच्यावर नव्हे तर एमआयएम पक्षावर आहे. या एमआयएमने प्रकाश आंबेडकरांनाही फसवले आहे. इम्तियाज जलील यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याविषयी मला काहीही बोलायचे नाही.
- चंद्रकांत खैरे

बातम्या आणखी आहेत...