आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभाग:कापूसवाडगाव येथे खरीप बीज प्रात्यक्षिके‎ ; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांत‎ जनजागृती मोहीम‎

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर‎ तालुकास्तरावर खरीप पीक पेरणी हंगाम ‎ ‎नियोजनासाठी कृषी विभागाकडून‎ शेतक-यांसाठी गावपातळीवर जनजागृती‎ मार्गदर्शन मेळावे आयोजित करुन बियाणे‎ उगवण क्षमता तपासणी कशा पद्धतीने करायची ‎ ‎ यांची प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत. कापूस ‎ ‎ वाडगाव येथे खरीप हंगाम बीज प्रक्रिया‎ मार्गदर्शन मेळावा तालुका कृषी अधिकारी‎ अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी पारखे ‎ ‎ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.‎ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणेची उगवण‎ क्षमता तपासणी प्रयोग व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक‎ कृषी सहाय्यक मीना पंडित यांनी शेतकऱ्यांना‎ करुन दाखवली. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना‎ खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस, मका,‎ बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग या‎ सारख्या पिकांना पिकाची उत्पादन व उत्पादकता‎ यांचे संतुलन ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी‎ प्रत्येक पिकाच्या चांगल्या प्रकारच्या बियाण्यांचा‎ वापर करावा, त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ बीज प्रक्रिया करणे हे सुद्धा गरजेचे असते,‎ त्यामुळे बरेच रोग व किडी, बुरशी पासून‎ पिकाचे संरक्षण होते कारण बहुतेक रोग हे‎ बियाणे पासून होतात ते प्रमाण बीज प्रक्रिया‎ केल्यामुळे कमी होतात, शेतकर्‍यांनी बियाणे‎ घरचे ठेवलेले बियाणे वापरले तरी चालते हे‎ सांगण्यात आले. यावेळी हुमनी अळी नियंत्रण,‎ सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी‎ प्रयोग, खत व्यवस्थापन, सेंद्रिय शेती,‎ एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व‎ मुल्य साखळी विकास योजने अंतर्गत व कृषी‎ विभागाची महाडीबीटी, फळबाग लागवड‎ योजना बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.‎ यावेळी कृषी पर्यवेक्षक एम.एस. गांगुर्डे, सरपंच‎ आशा रामनाथ धामणे, उपसरपंच नानासाहेब‎ थोरात, दत्तात्रय धामणे, राजेंद्र गिरी, कृष्णा‎ पंडित, अशोक थोरात, विकास खरमाले, दीपक‎ बरकसे, चंद्रकांत थोरे, भाऊसाहेब त्रिभुवन,‎ सुनील निगळ, नंदू रोठे व इतर शेतकरी मोठ्या‎ प्रमाणात उपस्थित होत‎ कृषी सहाय्यक मीना पंडित शेतक-यांना प्रात्यक्षिके दाखवताना.‎ कृषी सहाय्यक मीना पंडित शेतक-यांना प्रात्यक्षिके दाखवताना.‎

बातम्या आणखी आहेत...